श्री कोटेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट १९५२ पासून कार्यरत आहे. सुरुवातीला कोटेश्वर मंदिराचे व्यवस्थापन पाहणे आणि गावात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे या उद्देशाने या ट्रस्टची स्थापना करण्यात आली होती. २०२३ मध्ये, मंदिरातील धार्मिक कार्यक्रम आणि गावातील सांस्कृतिक उपक्रमांव्यतिरिक्त, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी परिसरामध्ये विविध सामाजिक प्रकल्प राबवण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे.
संयुक्त राष्ट्र संघटनेने निश्चित केलेली शाश्वत उद्दिष्टे विचारात घेता, ट्रस्टने आपल्या विविध सामाजिक आणि धर्मादाय प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी खालील शाश्वत उद्दिष्टांची निवड केली आहे:
१. भूकमुक्ती – शाश्वत विकास ध्येय (SDG) २
२. उत्तम आरोग्य आणि कल्याण – शाश्वत विकास ध्येय (SDG)
३. दर्जेदार शिक्षण – एसडीजी ४ (SDG 4)
४. स्वच्छ पाणी आणि स्वच्छता – एसडीजी ६ (SDG 6)
५. परवडणारी आणि स्वच्छ ऊर्जा – एसडीजी ७ (SDG 7)
६. शाश्वत समुदाय – एसडीजी ११ (SDG 11)
७. पाण्याखालील जीवन – एसडीजी १४ (SDG 14)
८. ध्येयांसाठी भागीदारी – एसडीजी १७ (SDG 17)
या सामाजिक उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करून, ट्रस्टने खालील क्षेत्रांची ओळख पटवली:
१. सांस्कृतिक विकास आणि जतन – उत्सवांचे आयोजन, पारंपरिक प्रथांचे सातत्य, उत्सवाच्या मिरवणुका, पारदर्शकता आणि स्वयंचलित (ऑटोमेशन) कार्यपद्धतींचा अवलंब, इत्यादी.
२. वैद्यकीय आणि आरोग्य
३. शिक्षण – पाठिंबा, शिष्यवृत्ती आणि मान्यता
४. सामाजिक प्रकल्प – ग्राम स्पर्धा, वृत्तपत्र वाचनालय, भाविकांसाठी निवास व्यवस्था, स्वच्छ ऊर्जा इत्यादी.